महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 17, 2021, 8:30 PM IST

ETV Bharat / state

बचत गटाच्या माध्यमातून महिलांची मोत्याची शेती, सहा महिन्यात मिळणार उत्पादन

आर्णी तालुक्यातील लोणी गावामधील जय दुर्गा माता महिला बचत गटाने मोत्याची शेती केली आहे. या बचत गटामध्ये 12 महिलांचा समावेश आहे. मानव विकास मिशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मदतीतून या मोत्याच्या शेतीला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान पुढील सहा महिन्यांमध्ये मोत्याचे उत्पादन हाती येणार असल्याची माहिती या महिलांनी दिली.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांची मोत्याची शेती
बचत गटाच्या माध्यमातून महिलांची मोत्याची शेती

यवतमाळ -आर्णी तालुक्यातील लोणी गावामधील जय दुर्गा माता महिला बचत गटाने मोत्याची शेती केली आहे. या बचत गटामध्ये 12 महिलांचा समावेश आहे. मानव विकास मिशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मदतीतून या मोत्याच्या शेतीला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान पुढील सहा महिन्यांमध्ये मोत्याचे उत्पादन हाती येणार असल्याची माहिती या महिलांनी दिली.

शेतातच सुरू केला उद्योग

दुर्गा माता बचत गटातील एका सदस्यांच्या शेतात मुबलक पाणी आहे. तिथे 12 फूट रूंद आणि 15 फूट लांब आणि 4 फूट खोल असे 2 खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यात नॉयलॉन दोरीच्या साहाय्याने शिंपल्यांना एका जाळीच्या पिशवीत ठेवून पाण्यात सोडण्यात आले. शिंपल्यांना समुद्रा सारखे वातावरण मिळावे म्हणून खड्ड्यात मशीनद्वारे तीनदा पाणी दिले जाते, तसेच या ठिकाणी असलेले शेवाळ आणि मृत शिंपले सुद्धा वेळोवेळी बाजूला काढण्यात येतात. या शिंपल्यांना अन्नाचा पुरवठा करण्यात येतो, तसेच नियमित शिपल्याची तपासणी देखील करण्यात येते. हे सर्व काम महिला करतात. सध्या येथे दोन खड्डे असून, दोन्ही खड्यात मिळून 2500 शिंपले आहेत. एका शिंपल्यात दोन मोती याप्रमाणे या शेतीमधून महिलांना 5 हजारांचे उत्पादन मिळणार आहे. यातील काही शिंपले मृत झाले तरी देखील, 4 हजार मोत्यांचे उत्पादन मिळेल अशी अशा या महिलांना आहे.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांची मोत्याची शेती

नागपूरच्या सुरजि ट्रेडिंग कंपनीसोबत करार

मोत्याला सरासरी 300 ते 900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळेल अशी माहिती या महिलांनी दिली. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर येथिल सुरजि ट्रेडिंग कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे मोती विकण्याच्या जबाबदारीतून या महिलांची सुटका झाली आहे. जेंव्हा उत्पादन मिळेल तेव्हा महिला बचत गट आणि माविमचा उत्पादनात समान वाटा असणार आहे. शिंपले बीज आणि खाद्य प्रशिक्षण कंपनीने महिलांना उपलब्ध करून दिले असून, मोती संवर्धनच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details