महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पांढरकवडा वन्यजीव विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित - Painganga Sanctuary

पांढरकवडा वन्यजीव विभागातील पर्यटकांचे आकर्षण असणारे टिपेश्वर अभयारण्य देखील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होणार आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची संख्या वाढली होती यामुळे महसूल देखील वाढला होता.

pandharkavada wildlife department handover to melghat tiger project
पांढरकवडा वन्यजीव विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरित

By

Published : Apr 3, 2020, 10:48 AM IST

यवतमाळ- पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या निंयत्रणात असणारा पांढकवडा वन्यजीव विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे 1 एप्रिलपासून हस्तांतरित करण्यात आला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांचे आदेशान्वयेपांढरकवडा वन्यजीव विभागाचे हस्तांतरण करण्यात आले आहे.

पांढरकवडा (वन्यजीव) विभागाची निर्मिती 3 सप्टेंबर 2013 ला करण्यात आली होती. पांढरकवडा वन्यजीव विभागामध्ये टिपेश्वर व पैनगंगा अशी दोन अभयारण्ये असून पैनगंगा अभयारण्याचे सद्य:स्थितीत क्षेत्र 400.67 चौरस किलोमिटर आहे. तर टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र 148.62 चौरस किलोमिटर आहे. टिपेश्वर अभयारण्याची निर्मिती ही दिनांक 30 एप्रिल 1997 रोजी झाली होती. तर पैनगंगा अभयारण्य हे मुळात किनवट गेम रिझर्व अभयारण्य म्हणून 1971 रोजी निर्माण करण्यात आले होते.

टिपेश्वर अभयारण्यामध्ये 3 नर वाघ, 5 मादी वाघ, 9 अवयस्क वाघ असे एकूण सतरा वाघ आहेत. याशिवाय तीन ते चार छावे देखील आहेत. टिपेश्वर हे भारतातील वाघासाठीचे व इतर वन्यप्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे व त्यामुळे पर्यटकांची संख्या व महसूल यामध्ये देखील वाढ झालेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details