महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 21, 2020, 7:27 AM IST

ETV Bharat / state

पालघर घटनेची चौकशी स्पेशल आयजीमार्फत; गृहमंत्री अनिल देशमुख

तिघांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास स्पेशल आयजीकडून करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

home minister anil deshmukh
अनिल देशमुख , गृहमंत्री

यवतमाळ - येथे तिघांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास स्पेशल आयजीकडून करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पालघर येथील घटनेतील 101 लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेला वेगळा रंग देत असल्याची टीकाही यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी एकत्र यावे - गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सर्व विभागामध्ये अतिशय चांगला समन्वय घडवून आणला असून प्रशासनाचे काम उत्तम आहे. कोरोना विरुद्धची लढाई ही सर्वांच्या सहकार्याने लढणे आवश्यक असल्यामुळे या लढाईत सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

अनिल देशमुख , गृहमंत्री

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार ख्वाजा बेग, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातील प्रतिबंधित असलेल्या मेमन सोसायटीमध्ये भेट देऊन प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला.

यावेळी बोलतांना गृहमंत्री म्हणाले, जिल्हा व पोलीस प्रशासन चांगले काम करीत असून सर्व विभागाचा समन्वय चांगला आहे. कोरोना संदर्भात डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना रोज अपडेट माहिती उपलब्ध होते. ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा चांगल्या काम करत असून इंदिरा नगर, जाफर नगर, मेमन सोसायटी हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागात प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 63 तबलिगी समाजाचे लोक आले होते. यासर्वांकडे प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष दिले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. असे आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. यवतमाळ जिल्हा लवकरच रेड झोनमधून ऑरेंज व नंतर ग्रीन झोनकडे वाटचाल करेल, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांनी एकूण 670 चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 16 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 9 जणांना सुट्टी देण्यात आली असून सद्यस्थितीत 7 पॉझिटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 142 जण तर गृह विलगीकरणात एकूण 789 जण असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details