यवतमाळ -आषाढी एकादशी आणि डॉक्टर डे एकाच दिवशी आले आहेत. कोरोना संकट काळात डॉक्टर एका योध्याप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे यवतमाळ येथील एका चित्रकाराने डॉक्टरात विठ्ठल साकारून अनोख्या पद्धतीने भावना व्यक्त केली आहे.
चित्रकाराने डॉक्टरात साकारला विठ्ठल; अनोख्या पद्धतीने भावना व्यक्त - यवतमाळ न्यूज
आषाढी एकादशी आणि डॉक्टर डे एकाच दिवशी आले आहेत. कोरोना संकट काळात डॉक्टर एका योध्याप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे यवतमाळ येथील एका चित्रकाराने डॉक्टरात विठ्ठल साकारून अनोख्या पद्धतीने भावना व्यक्त केली आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठी संत परंपरा लाभली आहे. वारकरी दरवर्षी न चुकता आळंदी ते पंढरपूर पायी वारी करुन आपल्या लाडक्या विठू माऊलीचे दर्शन घेतात. यावर्षी वारकरी मंडळीला पंढरपूरला जाता आले नाही. तर, कोरोना संकट काळात डॉक्टर दिवसरात्र एक करून रुग्णांना बरे करीत आहेत. या काळात रुग्णांसाठी डॉक्टर हेच विट्ठल आहेत. रुग्णांच्या हाकेला साथ देत डॉक्टररुपी विठ्ठल रुग्णांना बरे करत आहेत. या भावना स्कूल ऑफ स्कॉलरचे चित्रकला शिक्षक महेश ठाकरे आपल्या कलेतून व्यक्त केल्या आहेत.