यवतमाळ - कोणतेही व्यसन हे घातक आहे. फुफ्फुस खराब होतात. दुसरे फुफ्फुस लावता येत नाही. तंबाखूमध्ये निकोटीन असते. माणसाचे आयुष्य 70 वर्ष असेल तर व्यसनाने 20 वर्ष आयुष्य कमी होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे. ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम गुटखा मुक्त समाज अभियान शुभारंभप्रसंगी बोलत होते. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुटखा बंदीकडून गुटखा मुक्तीकडे अभियान सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना डॉ. लहाने यांनी विविध मुद्यांवर आपले मत मांडले.
तंबाखू ओढल्याने 26 आजार व तंबाखूचे सेवन केल्यामुळे 22 प्रकारचे आजार होत असून अशा व्यक्तीच्या सानिध्यात असणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीवरही त्याचा 70 टक्के दुष्परीणाम होतो. समाज व्यसनमुक्त झाल्यास यामुळे होणारे 14 टक्के मृत्यू थांबतील. त्यामुळे गुटखामुक्ती योजना राबविणे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. गुटखा म्हणजे केवळ तंबाखू नसून इतर सर्व प्रकारच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी गावातील नागरिकांनी ग्रामसभेत गुटखा बंदीसाठी ठराव घेण्याचे व गावात तंबाखू खाणे, विकणे वा बाळगणे प्रतिबंधीत करण्यात यावे, असेही पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
'त्रुटी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार'