यवतमाळ- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या चार जणांना सुट्टी देण्यात आली आहे. यापैकी तीन जण गृह विलगीकरणात तर एक जण संस्थात्मक विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली पुढील 14 दिवस राहणार आहे. गुरुवारी नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या 78 जणांच्या नमुन्यापैकी 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तरीसुध्दा यातील तीन जणांचे नमुने व एका नागरिकाच्या नमुन्याचे परत निदान करण्यासाठी नागपूरला पाठविण्यात येणार आहे.
यवतमाळमधील 78 पैकी 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; आयसोलेशन वॉर्डातील चार जणांना सुट्टी - yavatmal corona
सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात एकूण 111 जण भरती आहेत. यात आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असून यापैकी सात जण बाहेरच्या राज्यातील आहेत तर एक जण स्थानिक आहे. या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. याच शोधमोहिमेच्या अनुषंगाने गत 24 तासात 66 लोकांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले.

शुक्रवारी एकूण 74 लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एकूण 67 आहे. यात धामणगाव रोडवरील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहात 23 जण तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात 44 जण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहे.