महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना टनामागे आठ हजार रुपयांचा फटका - संत्रा उत्पादक शेतकरी

यवतमाळ जिल्ह्यात सिंचन सुविधा असणारे शेतकरी संत्रा उत्पादन करण्याला पसंती देतात. मात्र, या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. शेतात उत्पादन कमी आणि बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांचे एका टनामागे आठ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

Orange Crop
संत्रा उत्पादन

By

Published : Mar 6, 2020, 12:24 PM IST

यवतमाळ -अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वातावरणात होणारे बदल याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात उत्पादन कमी आणि बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांचे एका टनामागे आठ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे

हेही वाचा -कुष्ठरोगापेक्षा करोना भयंकर आजार'

जिल्ह्यात सिंचन सुविधा असणारे शेतकरी संत्रा उत्पादन करण्याला पसंती देतात. मात्र, या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. संत्रा लागवडीसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. दरवर्षी साधारण वीस हजार रुपये प्रतीटन या दरात संत्र्याची विक्री होते. मात्र, यावर्षी प्रतीटन फक्त दहा ते बारा हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे टनामागे आठ ते दहा हजार रुपये तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details