यवतमाळ - खासदार संजय राऊत खूप बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही का गांभीर्याने (सिरीअस) घेता. त्यांना कव्हरिंग फायरिंगसाठी ठेवण्यात आले आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आले होते. जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी सुशांतसिंह प्रकरणाबाबत बोलत होते. त्यावेळी त्यांना खासदार संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी टोला लगावला.
मुंबई पोलिसांची काम करण्याची पद्धत उत्तम पण..
यावेळी त्यांना मुंबई पोलिसांबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कामाची पद्धत उत्तम आहे. मी 5 वर्षे जवळून त्यांचे पाहिले आहे. मात्र, त्यांच्यावर असलेल्या दबावामुळे काही निर्णय चुकले. तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसाला क्वारंटाईन करणे किंवा सुशांतसिंह प्रकरणातील दस्तऐवज न देणे, दीशा सालीयनची फाईल डिलिट होणे. यामुळे त्यांच्याबाबत चुकीचा संदेश गेला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -अनोखे आंदोलन: रस्ता दुरुस्तीसाठी नगरसेवक बसला खड्डयात