यवतमाळ - राज्यातील महाविकास आघाडी सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आमचा सरकार कधी येईल हे सांगता येणार नाही ते काळच ठरविणार आहे. आम्ही सत्तेत असू तेव्हा जनतेचे काम करू आणि विरोधात असू तर जनतेसाठी संघर्ष करू, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला. ते वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आले नाही - देवेंद्र फडणवीस - सरकार आजन्म अमरपट्टा घेऊन आलेले नाही
रयतेच्या पाठीशी उभा राहणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मानदंड घालून दिले, त्या मानदंडावर महाराष्ट्र चालला पाहिजे. मात्र दुर्दैवाने राज्य सरकार केवळ मदतीच्या घोषणा व जीआर काढतात. पण खडकूही देत नाही, असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. गेल्या दोन वर्षांपासून या सरकारने विकासासाठी कुठलाही निधी दिलेला नाही. मात्र भाजपा सत्तेवर आल्यास निधी वितरित केल्या जाईल.
देवेंद्र फडणवीस
Last Updated : Oct 1, 2021, 5:03 PM IST