यवतमाळ : कोरोना बधितांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी निर्मानाधीन असलेली स्त्री रुग्णालय येत्या चार दिवसात बधितांच्या उपचारासाठी कार्यान्वित करण्याचे आदेश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी प्रशासनाला दिले.
स्त्री रुग्णालयाची पाहणी
शहरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार होत असलेल्या स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामाची परिस्थती, बेड उपलब्धता, ऑक्सीजन बेड पॉईंटस, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ आदींचा आढावा घेतला. दिवसरात्र एक करून येथील उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करावीत. जेणेकरून तीन-चार दिवसांत हे रुग्णालय कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कार्यान्वित करण्यात येईल, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी जि. प. अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललित व-हाडे उपस्थित होते.
चार दिवसांत रुग्णालय कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कार्यान्वित करा; पालकमंत्री भुमरे - यवतमाळ कोरोना रुग्ण संख्या
बधितांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी निर्मानाधीन असलेली स्त्री रुग्णालय येत्या चार दिवसात बधितांच्या उपचारासाठी कार्यान्वित करण्याचे आदेश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी प्रशासनाला दिले.
पालकमंत्री भुमरे