महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 34 वर - yavatmal covid centre

वैद्यकिय महाविद्यालयात सोमवारी एकूण 75 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात 1 पॉझिटिव्ह आणि उर्वरित 74 अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 158 झाली आहे.

yavatmal covid centre
यवतमाळमध्ये पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 34 वर

By

Published : Jun 9, 2020, 7:43 AM IST

यवतमाळ - महागाव येथील कोरोनाबाधित मृताच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोनासाठी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 34 झाली आहे. संबंधीत व्यक्तीला कोविड केअर सेंटरमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे.

वैद्यकिय महाविद्यालयात काल (सोमवारी) एकूण 75 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात 1 पॉझिटिव्ह आणि उर्वरित 74 अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 158 झाली आहे. यापैकी 122 जण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर दोन कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details