यवतमाळ - 15 एप्रिलला नागपूर येथील मेयो रुग्णालयातून प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये शटडाऊन केलेल्या भागातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातील असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह; एकूण रुग्णांची संख्या 10 15 एप्रिलला 4 कोरोनाबाधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह निघाल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यानंतर मरकजमधून आलेले 7 आणि एक स्थानिक असे 8 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी एक पॉझिटीव्ह तर आज पुन्हा 1 त्या भागातील एक रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने रुग्णाची संख्या 10 झाली आहे. या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 38 जणांना आज सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 98 जण भरती आहेत. गेल्या 24 तासात चार जण भरती झाले आहेत. तसेच बुधवारी तपासणीकरीता 24 जणांचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहे. गृह विलगीकरणात एकूण 133 जण असून संस्थात्मक विलगीकरणाअंतर्गत अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहात 34 जण ठेवण्यात आले आहे.