महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैराटची पुनरावृत्ती; पळून लग्न केल्यामुळे मुलगी व जावयावर प्राणघात हल्ला - sairat in yavatmal

2016 साली शुभांगी आणि सागर अंभोरे हे दोघेही पळून गेले होते. त्यानंतर दोघांनी आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे आरोपी दादाराव सिताराम माटाळकर यांच्या मनात आपली समाजात बदनामी होत असल्याचा राग सतत येत होता.

पळून लग्न केल्यामुळे मुलगी व जावयावर प्राणघात हल्ला
पळून लग्न केल्यामुळे मुलगी व जावयावर प्राणघात हल्ला

By

Published : Jun 1, 2021, 1:47 PM IST

यवतमाळ - प्रेमाचा आनाभाता घेत दोघे घरच्या नातेवाईकांच्या मनाविरोधात जाऊन पाच वर्षापूर्वी पसार होऊन लग्न केले. तेव्हापासून प्रचंड संतापलेल्या मुलीच्या वडिलाने स्वतःच्या मुलीवर आणि जावाईवर चाकुने सपासप वार करून दोघालाही गंभीर जखमी केल्याची घटना आर्णी तालुक्यातील चिकणी(क) येथे घडली. या घटनेत शुभांगी सागर अंभोरे आणि सागर काशीनाथ अंभोरे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

2016 मध्ये केला प्रेमविवाह
आरोपी व जखमी असलेल्या मुलीचे वडील दादाराव सिताराम माटाळकर यांनी मुलगी शुभांगी आणि जावाई यांच्या घरात जाऊन चाकुने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. 2016 साली शुभांगी आणि सागर अंभोरे हे दोघेही पळून गेले होते. त्यानंतर दोघांनी आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे आरोपी दादाराव सिताराम माटाळकर यांच्या मनात आपली समाजात बदनामी होत असल्याचा राग सतत येत होता. त्यातूनच दादाराव यांनी मुलगी आणि जावाईच्या घरात जाऊन मुलीच्या पोटावर चाकुने हल्ला केला. त्यानंतर जावाई सागर अंभोरे यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर हल्ला करून दोघाला गंभीर जखमी केले. दरम्यान या घटनेची तक्रार सागरचे काका नारायण अंभोरे यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून पोलीसांनी आरोपी दादाराव माटाळकर यांच्या विरोधात जीवाने मारण्याच्या उद्देशाने आणि जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details