यवतमाळ - वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली असून या बैठकीत सर्वच मंत्री कडक निर्बध लावण्याच्या बाजूने होते. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात शंभर टक्के लॉकडाऊन लावला जाईल, असे राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. ते यवतमाळ येथे पालकमंत्री पदी वर्णी लागल्यावर आज आढावा बैठक घेण्यासाठी आले असता बोलत होते.
राज्यात लवकरच शंभर टक्के लॉकडाऊनची शक्यता- संदिपान भुमरे
वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली असून या बैठकीत सर्वच मंत्री कडक निर्बध लावण्याच्या बाजूने होते. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात शंभर टक्के लॉकडाऊन लावला जाईल, असे राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
राज्यात लवकरच शंभर टक्के लॉकडाऊनची शक्यता- संदिपान भुमरे
येथील जिल्हा नियोजन सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला जिल्ह्याची परिस्थिती ही भिषण असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात 100 बेड वाढविण्यात येणार असून शिवाय महिला रुग्णालयात सुद्धा ऑक्सिजन बेड तयार करण्यात येणार आहे. नवीन 16 रुग्णवाहिका जिल्हा नियोजन निधीतून घेण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाला आवश्यकता वाटल्यास आणखी बेड वाढविले जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची आबाळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.