यवतमाळ - जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यात विजांच्या कडाकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील साखरा येथील शेतकरी विनोद केशव किनाके (३८) कुंभा शिवारात असलेल्या जगन जोगीराम परचाके यांच्या शेतात काम करताना वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने विनोद किनाके यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना - Yavatmal
घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने विनोद किनाके यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
ग्रामीण रुग्णालयास मारेगांवचे तहसीलदार दीपक पुंडे, नायब तहसीलदार दिगांबर गोहोकर, मंडळ अधिकारी शेळके, कुंभा येथील तलाठी घोटकर, यांनी तात्काळ भेट देऊन आढावा घेतला. मृतक विनोद किनाकेंच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.