यवतमाळ - पुसद शहरापासून जवळच असलेल्या मधुकरनगर येथे किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. किरकोळ कारणावरून मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षा चालविणाऱ्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बांधकामाच्या साहित्यावरून झाला वाद
मधुकर नगर येथील रहिवासी सय्यद अली हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. हे करत असताना त्यांच्या शेजारी सय्यद मोईन सय्यद बाबू ठेकेदार यांनी त्याचे ठेकेदारीचे साहित्य मृत सय्यद अली यांच्या रिक्षामध्ये सय्यद मोइन यांनी घेतलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मृत सय्यद अली यांना नेण्यास सांगितले. सय्यद मोईन यांच्या सांगण्यावरून सय्यद अली यांनी हे सेंट्रींगचे साहित्य त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचविले. पण, सय्यद अली यांना त्याचे भाडे सय्यद मोइन यांनी नंतर देतो असे सांगितले. त्यानुसार सय्यद अली हे रिक्षाचे भाडे मागण्यासाठी सय्यद मोईन यांच्या वडिलांच्या घरी गेले असता त्यांनी भाडे माझा मुलगा सय्यद मोईन यांच्याकडून घ्या, असे सांगितले. त्यामुळे सय्यद अली हे आपल्या घरी परत आले.