यवतमाळ - जिल्ह्यात बुधवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 27 झाली आहे. आज नव्या 46 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर, आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 26 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये 46 नवे रुग्ण, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू; 26 जणांना डिस्चार्ज - yavatmal covid-19 news
जिल्ह्यात बुधवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 27 झाली आहे. आज नव्या 46 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 344 झाली आहे.
मृतांमध्ये उमरखेड तालुक्यातील खरूज येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश झाला आहे. जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 30 पुरुष व 16 महिला आहे. यात दिग्रस शहरातील 13 पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील संभाजी नगर येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील 10 पुरुष व आठ महिला, झरी जामणी शहरातील तीन पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील अंबिका नगर येथील एक महिला आणि नेर शहरातील दोन पुरुष यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दि. 28 पर्यंत ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 324 होती. यात आज 47 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 371 वर पोहचला. मात्र, एकाचा मृत्यू आणि कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 344 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 310 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 34 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 899 झाली आहे. यापैकी 528 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात 27 मृत्यूंची नोंद आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहेत.