यवतमाळ -ग्रामपंचायतने खोदलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घाटंजी तालुक्यातील खापरी येथे घडली. खापरी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडली, असा आरोप मृत चिमुकलीच्या काकाने केला आहे.
घाटंजी तालुक्यातील खापरी गावातील जोगीनगर येथे ग्रामपंचायतीच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. यामुळे ग्रामपंचायतीने राजू पवार याच्यां घरासमोर एक महिन्याआधी तीन फुट खड्डा खोदून ठेवला होता. तो न बुजविता तसाच ऊघडा ठेवल्यामुळे राजू पवार यांची साडे सतरा महिन्याची चिमुकली खेळताना खड्यात पडून मरण पावली. त्यामुळे खापरी ग्राम पंचायतवर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी मृत चिमुकलीच्या नातेवाईकांनी केली आहे.