यवतमाळ - शिवसेना-भाजप युतीकडून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या २५ मार्चला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
२५ मार्चला भावना गवळी, माणिकराव ठाकरे करणार उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेना-भाजप युतीकडून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या २५ मार्चला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे हेही आपला उमेदवारी अर्ज २५ मार्चला दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटिका वैशाली येडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप आणि रक्तदान करून करून अर्ज भरण्यात येणार आहे. प्रहार संघटनेकडून हा अनोखा उपक्रम राबवून प्रचाराला करण्यात येणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवारसुद्धा लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत.