यवतमाळ - जिल्ह्यात विदेशातून आलेले तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘होम क्वारेंटाईन’ ठेवण्यात आले होते. 22 मार्च रोजी जिल्ह्यात दीडशेपार गेलेला हा आकडा आज 26 मार्च रोजी 88 पर्यंत खाली आला आहे. होम क्वारेंटाईनच्या परिघाबाहेर आलेल्या नागरिकांना घरातच राहून काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील ‘होम क्वारेंटाईन’ची संख्या 88 - कोरोना लेटेस्ट बातमी यवतमाळ
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काहींना ‘होम क्वारेंटाईन’ ठेवण्यात आले होते. 22 मार्च रोजी जिल्ह्यात दीडशेपार गेलेला हा आकडा आज 26 मार्च रोजी 88 पर्यंत खाली आला आहे.
यवतमाळ
विलगीकरण कक्षात देखरेखीखाली (प्रिझमटिव्ह केसेस) असलेल्या एकाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र, त्यांच्यात लक्षणे असल्यामुळे सुट्टी देण्यात आली नाही. विलगीकरण कक्षात एकूण चार जण असून यापैकी तीन जण पॉझिटिव्ह आहेत. त्यांचे नमुने आज पुन्हा नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले.