यवतमाळ -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बिगर शेती कर्ज अनेकांनी घेतले होते. मात्र, अनेक वर्षांपासून कर्जाची परतफेड केली नाही. या थकीत कर्जाच्या रकमेचा आकडा 97 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे आता संचालक मंडळांने टॉप 150 प्रकरणातील कर्ज वसुलीचे टार्गेट' समोर ठेवले आहे. या वसुलीसाठी बँक आक्रमक झाली असून, अधिकाऱ्यांना सक्तीने वसुली करण्याचे आदेश बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी दिले आहेत.
थकबाकीदारांना नोटीस
अनेक थकबाकिदारांनी बॅंकेकडून वाहन, गृह, उद्योग, लघु उद्योग यासाठी कर्ज घेतले होते. मात्र अनेक वर्षानंतर देखील त्यांनी हे कर्ज फेडलेले नाही. अशा दीडशे बड्या थकबाकिदारांना बॅंकेकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत थकबाकिदारांकडून कर्ज वसूल करण्याचा निर्धार बॅंक प्रशासनाने केला आहे.