यवतमाळ - आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकही चिंतेत होते. सुरुवातीच्या तीन दिवसात जिल्ह्यात 50 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र, शनिवारी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याने यवतमाळकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
यवतमाळकरांना दिलासा, चोवीस तासात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही - यवतमाळ चोवीस तासात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
शनिवारी प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसल्याने यवतमाळकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 80 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण 160 जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती आहेत.
सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 80 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण 160 जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस सोडले तर शेवटच्या दोन दिवसात जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतील वाढ कमी झाली, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असले तरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना तपासणीकरता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 1 हजार 173 आहे. यापैकी 1 हजार 155 नमुन्यांचे अहवाल प्राप्त तर 18 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. प्राप्त रिपोर्टपैकी 1 हजार 64 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची संख्या 108 तर गृह विलगीकरणात एकूण 1 हजार 91 जण आहेत. शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले तरच आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. त्यामुळे, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.