महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय पक्षांकडून न्याय मिळाला नाही- बाबासाहेब गाडे पाटील - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

आता यापुढे विधानसभा, लोकसभा निवडणूक लढायची नाही, असा निर्णय बाबासाहेब गाडे पाटील यांनी घेतला आहे.

बाबासाहेब गाडे पाटील

By

Published : Oct 11, 2019, 5:22 PM IST

यवतमाळ- 'गेल्या 40 ते 45 वर्षांपासून राजकारणात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा सहकारी बँक, बाजार समिती आदी निवडणुका लढविल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागून कोणत्याही पक्षाने माझी दखल घेतली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांकडून न्याय मिळाला नाही,' अशी नाराजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील यांनी बोलून दाखवली.

बाबासाहेब गाडे पाटील

हेही वाचा-शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर

ज्योती मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता.11) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता यापुढे विधानसभा, लोकसभा निवडणूक लढायची नाही, असा निर्णय स्वत: घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणूक होऊ घातली असून, यात संतोष ढवळे एकमेव सामान्यांसाठी राबणारा कार्यकर्ता अपक्ष म्हणून रिंगणात आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाणीव असणारा हा उमेदवार आहे. गेल्या 27 वर्षापासून राजकारणात असूनही या माणसाकडे संपत्ती निरंक आहे. मात्र, त्यांनी माणसे जोडली आहेत. ढवळे यांना सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचा बंडखोर उमेदवार संतोष ढवळे, नगरसेवक पिंटू बांगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details