यवतमाळ - विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था हलाखीची आहे. शेतमालाला भाव नाही, प्रक्रिया उद्योग नाही. हे सत्य असले तरी सिंचनवाढीसाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळी ५० टक्के शेतजमीन ओलिताखाली येईल त्यावेळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
यवतमाळच्या घाटंजी येथे युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी गडकरींनी अहीर यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. दुधाचा व्यवसाय करणारे हंसराज अहिर हवेत, की दारू विक्री करणारा उमेदवार हवा. बरबादीचा मार्गावर जायचे, की विकासाच्या मार्गावर जायचे हे ठरवा. तसेच मतदान करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.