यवतमाळ -महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४० वा स्मृतीदिन पुसद येथे संपन्न झाला. यावेळी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील ९ प्रगतशील शेतकरी व शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले. येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा कार्यक्रम पार पडला.
वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीने ९ प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४० वा स्मृतीदिन पुसद येथे पार पडला. यावेळी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने, वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील ९ प्रगतशील शेतकरी व शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले.
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. दरवर्षी महाराष्ट्रातील कुशल शेतकरी व शास्त्रज्ञांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतो. त्यामुळे या कार्यक्रमाला अनेक शेतकरी आवर्जून उपस्थित राहतात. यावेळी सत्कार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येक शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची जोड देऊन जर शेती केली तर भरपूर उत्पन्न मिळवता येते, असे मत यावेळी सत्कारमूर्ती शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्रचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त दिगंबरराव माई हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आशिष पातुरकर (कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर) हे होते. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम नेहमी राबवले जातात. त्यामुळे अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून आपले वार्षिक उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्यात यशस्वी झाले आहेत.