यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 9 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरुवातीला या 9 जणांचे रिपोर्ट कोरोनासाठी पॉझिटिव्ह आले होते. मात्र, 14 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता सर्व जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट आज सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.
आयसोलशन वॉर्डातून पुन्हा 9 जणांना सुट्टी; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 45 - yavatmal corona update
इंदिरा नगर येथील एका जणाचा रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आला आहे. संबंधीत व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला होता आणि तो संस्थात्मक विलगीकरणात भरती आहेत.
इंदिरा नगर येथील एका जणाचा रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आला आहे. संबंधीत व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला होता आणि तो संस्थात्मक विलगीकरणात भरती आहेत. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 45 आहे. तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या 23 नमुन्यांचे रिपोर्ट येणे बाकी आह. तसेच उमरखेड येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या (लो रिस्क कॉन्टॅक्ट) 58 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.