महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganesh festival 2022 यवतमाळ शहरातील वृत्तपत्र वाटप करता बनला मूर्तिकार - Newspaper Distributor Turned Sculptor

यवतमाळ शहरात गणेशोत्सवाची लगबग Yavatmal City Ganesha Festival सूरू झाली आहे. मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अशास्थितीत यवतमाळ येथिल विश्वशांती नगरात वास्तव्यास असलेला नवोदीत मुर्तीकार भल्या पहाटे घरोघरी वृत्तपत्रे वाटप करून मुर्ती घडविण्याचा छंद जोपासत आहे.

sculptor
मूर्तिकार

By

Published : Aug 22, 2022, 4:57 PM IST

यवतमाळशहरात गणेशोत्सवाची लगबग सूरू Yavatmal City Ganesha Festival झाली आहे. मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अशास्थितीत यवतमाळ येथिल विश्वशांती नगरात वास्तव्यास असलेला नवोदीत मुर्तीकार भल्या पहाटे घरोघरी वृत्तपत्रे वाटप करून मुर्ती घडविण्याचा छंद जोपासत आहे. शासनाच्या नियमांचे उलंघन न करता केवळ लाला मातीच्या पर्यावरण पुरक गणेशमूर्ती Environmentally friendly Ganesha idol साकारून नैसर्गिक संवर्धनाचा सामाजिक संदेशही तो देत आहेत.

छंद जोपासून वृत्तपत्र वाटप करता बनला मूर्तिकार.. पर्यावरण पूरक गणेश स्थापनेचा देतोय संदेश

वृत्तपत्रे वाटण्याचे काम करत कला जोपासलीलखन सोनुले असे नवोदित मुर्तीकाराचे नाव आहे. तो शहरातील विश्वशांती नगर येथे राहतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. वडिलांना मिळाले ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामूळे आपलाही कुटुंबाला आधार मिळावा म्हणून लखन व त्याचा भाऊ चेतनने लहान वयातच वृत्तपत्र वाटप करणे सुरू केले. यापैशातून लखन शैक्षणिक गरजा पूर्ण करत आहे. वृत्तपत्र वाटप करीत असतानाच एके दिवशी गणेश मूर्ती घडवताना काही मूर्तीकार त्याच्या दृष्टीस पडले. बाल वयातच कलेची आवड असल्याने हळूहळू मूर्तीकरांसोबत ओळख निर्माण केली. त्यामुळे गणेश उत्सव आला की मूर्तिकारांकडे जाऊन मातीचा खेळ करणे, व मुर्तीकांराना वाटले ती मदत करने हे एकच काम तो करीत गेला. खेळता खेळता आपण त्या लाल मातीच्या प्रेमात पडलो हे लखनला माहीत नव्हते. अशा स्थितीत त्या मूर्तीकारांसोबत मूर्ती घडवताना लखनाच्या मुर्त्यांनी केव्हा पुर्ण आकार घेतला. हे त्याला देखील कळले नाही. गेल्या 9 वर्षांपासून लखन वृत्तपत्रे वाटण्याचे काम करत आहेत. यासोबतच गेली 5 वर्षापासून लखन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करत आहे. या कामात लखनचा लहान भाऊ चेतन याचीही साथ आहे.


नैसर्गिक संसाधनांचा वापर करून मूर्ती तयारसरकारने पीओपी मूर्तींवर बंदी घातली POP idols banned आहे. अशा परिस्थितीत सुरुवाती पासूनच गणेशमूर्ती बनवताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी लखनने घेतली आहे. त्यामुळे घरगुती सार्वजनिक गणपतीमध्ये लाल माती, तनिस, गव्हाचा गवांडा आदी साहित्य वापरले जातात. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात. जेणेकरून मूर्तीचे विसर्जन झाल्यावर ती निसर्गात लीन होईल.


माहगाईची मुर्ती विक्रेत्यांना झळमहागाईची झळ गणेश मुर्ती विक्रेंत्यांना देखिल पोहचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रंग मातीचे दर 20 ते 30 रुपयांना वाढले आहे. पुर्वी लाल मातीच्या एक बॅग ठोक भावामध्ये 80 रुपयाला मिळत असे. यंदा भाव वाढ होवून लालमातीचे दर प्रती बॅग 100 ते 110 रुपये झाले आहे. त्याप्रमाणे पुर्वी रंगाची एक बॉटल मध्येही 40 ते 50 रुपयांची भाव वाढ झाल्याचे मुर्तीकार सांगत आहे.




बाजारात पीओपी मूर्तींच्या वर्चस्वदिवसेंदिवस नैसर्गिाचे नुकसान होत असल्याने सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत शहरात विविध ठिकाणी पीओपीच्या मूर्तींचा बोलबाला आहे. मातीच्या मुर्तीला वेळ, पैसा आणि श्रम अधिक लागतो. या तुलनेत पीओपीच्या मुर्तीला वेळ श्रम पैसा कमी लागतो. मात्र तरी देखिल मातीच्या मुर्तीला योग्य दर मिळत नाही. साधरणत 200 ते 300 रुपयांची तफावत दरामध्ये दिसून येते. अशा स्थितीत पीओपी मुर्ती अधिक चटक आणि चमकदार व आकर्षक असल्याने नागरिकही त्या खरेदीला प्राधान्य देत आहेत.



लाल माती आणि पीओपी तील फरकलाल मातीच्या मूर्ती पाण्यामध्ये सहज विरघळतात. तर पीओपीच्या मुर्त्या पाण्यामध्ये विरघळत नाही. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. जलप्रदुषण होते. पीओपीमूर्ती सार्वजनिक विहिरी, नदी, तलावांमध्ये विसर्जन केल्यानंतर विघटन होत नाही. पीओपी मुर्त्या चमकदार दिसण्यासाठी रासायनिक रंग वापरण्यात येतात. पाण्यात हे रंग अथवा पिओपी मिसळल्यास जलचरांच्या खाण्यात आल्याने जिवीतास धोका असतो. याउलट लाल मातीच्या मुर्ती घडविंताना साधे व नैसर्गिक रंग वापरण्यात येतात. त्यामूळे ते पर्यावरण पुरक असतात.



मूर्ती तयार करण्यासाठी साधारणत तीन महिन्यांचा लागतो कालावधीआधी अनुभव कमी असल्यामुळे मूर्तीला मागणी नव्हती, मात्र मागील वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. माती आणने, मूर्ती योग्य माती तयार करणे, ऑर्डर बुक करणे, ऑर्डर पोहच करणे असा साधारणत तीन महिन्यांचा कालावधी मूर्ती तयार करण्यासाठी लागतो. गेल्या वर्षी 60 मूर्ती तयार केल्या, यंदा तो आकडा 100 वर गेला आहे. या माध्यमातून जवळपास 30 ते 40 हजार मिळकत मिळते. घरगुती मुर्त्यांची किंमत 700 रुपये पासून तर 4000 पर्यंत आहे.

हेही वाचाNagpur Marbat Festival History 2022 ईडा पिडा, रोग राई घेऊन जाणाऱ्या मारबतीचा काय आहे इतिहास, जाणुन घेऊया

ABOUT THE AUTHOR

...view details