यवतमाळ -लोकनायक बापूजी अणे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून पुसद तालुक्यातील धुंदी घाटात दहा जुलै 1930 रोजी वन सत्याग्रह केला. त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले. सरकारने आठवण म्हणून स्मृतीशीला बनविली आहे. अणे हे विदर्भवादी नेते होते. त्यामुळे विदर्भवादी नेत्यांनी धुंदी घाटात जाऊन स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली. विदर्भ राज्य स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन आहे. विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, असा इशारा केंद्र सरकारला माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिला. त्यामुळे पुन्हा वेगळ्या विदर्भसाठी चळवळ तीव्र झाली असून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहे.
विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता- वामनराव चटप - माजी आमदार वामनराव चटप
विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता, असा इशारा केंद्र सरकारला माजी आमदार तथा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिला. त्यामुळे पुन्हा वेगळ्या विदर्भसाठी चळवळ तीव्र झाली असून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहे.
स्वतंत्र विदर्भसाठी चळवळ
आता स्वतंत्र विदर्भसाठी चळवळ
स्वतंत्र भारताची चळवळ ही या ठिकाणावरून अणे यांनी येथून सुरू केली होती. त्यामुळे आता अणे यांच्या विदर्भासाठी याच ठिकाणावरून विदर्भ आंदोलन समितीकडून आंदोलन सुरू केले आहे. येणाऱ्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी विदर्भ जण आंदोलन समितीचे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले.
हेही वाचा -मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया