महाराष्ट्र

maharashtra

रूग्णालयाने दिला दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह, संतप्त नातेवाईकांकडून शाह रुग्णालयाची तोडफोड

By

Published : May 9, 2021, 6:14 PM IST

यवतमाळमध्ये एक गंभीर प्रकार घडला आहे. येथे शाह रूग्णालयात अ‍ॅड. अरुण गजभिये यांचा आज मृत्यू झाला. पण, रूग्णालयाने दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना दिला. हा प्रकार स्मशानभूमीत गेल्यानंतर समोर आला. यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी शाह रूग्णालयाची तोडफोड केली.

yavatmal
यवतमाळ

यवतमाळ - यवतमाळ येथील अ‍ॅड. अरुण गजभिये यांचा आज (9 मे) शाह रूग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाऐवजी नातेवाईकांना शेळके नावाच्या दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह रूग्णालयाने दिला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. स्मशानभूमीत गेल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी शाह रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने नातेवाइकांची समजूत काढून प्रकरण शांत केले.

रूग्णालयाने दिला दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह, संतप्त नातेवाईकांकडून शाह रुग्णालयाची तोडफोड

रूग्णालयात सुरू होता उपचार

अ‍ॅड. अरुण गजभिये यांच्यावर शाह रुग्णालयात मागील 8 दिवसांपासून उपचार सुरू होता. त्यांचा आज अचानक मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना त्यांचा मृतदेह देण्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह देण्यात आला. यामुळे शाह हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार आज पुन्हा उघड झाला आहे. याआधीही शाह हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान, गजभिये प्रकरणी डॉ. शाह यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे सुरू आहे.

हेही वाचा -संकट टळले! चीनचे रॉकेट अखेर हिंद महारागरात कोसळले

हेही वाचा -'प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले?' रोखठोकमधून संजय राऊतांचे परखड विश्लेषण

ABOUT THE AUTHOR

...view details