यवतमाळ - शहरातील तलाव फैल परिसरातील जावाई नगरात एका कचऱ्याच्या ढिगावर नवजात मुलीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नवजात मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
यवतमाळमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळले नवजात मुलीचे जिवंत अर्भक - नवजात मुलीचे जिवंत अर्भक यवतमाळ
तलाव फैल परिसरातील जावाई नगरात एका कचऱ्याच्या ढिगावर नवजात मुलीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. नवजात मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - पुन्हा नकोशी.! शिरूरमध्ये नवजात अर्भकला जन्मदात्यांनीच सोडले बेवारस
सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. शोध घेतला असता त्यांना कचऱ्याच्या ढिगावर नवजात मुलीचे अर्भक आढळून आले. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत .