यवतमाळ : जिल्ह्यात आज(शुक्रवार) 16 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोनजण ॲन्टीजन चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेले 11 जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 16 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 11 जणांना डिस्चार्ज
गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 197 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 16 पॉझिटिव्ह आणि 181 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 120 जण भरती आहेत. तर, 11 जण उपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
शुक्रवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये 9 पुरुष व 7 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तृप्तीनगर येथील एक पुरुष, समनानी नगर वडगाव येथील एक पुरुष तसेच तायडे नगर येथील एक महिला असे तीनजण आहेत. दिग्रस शहरातील शंकर नगर येथील एक पुरुष, काझीपुरा येथील चार पुरुष व तीन महिला असे आठजण आणि दारव्हा येथील दोन पुरुष आणि तीन महिला असे पाचजण आहेत. तसेच ॲन्टीजन चाचणीद्वारे वणी येथील एक आणि भोपाळ येथून एक पॉझिटिव्ह पांढरकवडा येथे स्थलांतरित झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 197 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 16 पॉझिटिव्ह आणि 181 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 120 जण भरती आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 397 वर गेला आहे. यापैकी 283 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर, जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्यूंची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 139 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 6 हजार 764 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6 हजार 471 प्राप्त तर 293 रिपोर्ट अप्राप्त आहेत.