यवतमाळ -आर्णी येथील हारून नासर शेख यांनी रिक्षा कटल्याला जुनी बजाज एमएटी दुचाकी जोडून अनोखी गाडी तयार केली आहे. या देशी जुगाडामुळे त्यांना कमी मेहनतीत जास्त मजुरी मिळत आहे. त्यांच्या या आयडीयाची सध्या आर्णीत चर्चा आहे.
देशी जुगाड : हमालीच्या कटल्याला दुचाकीचा आधार; हारून शेख यांची शक्कल
या देशी जुगाडामुळे त्यांना कमी मेहनतीत जास्त मजुरी मिळत आहे.
शेख यांना दुचाकी रिक्षा कटल्याला लावण्यासाठी अंदाजे ८ हजार रुपये खर्च त्यांना आला. यातून त्यांनी हमाली करण्याचा नवा अंदाज निर्माण केला आहे. पाठीवर पोते घेवून ते कटल्यात टाकतात आणि दुचाकीवर बसून ओढतात. शेख हारून जेव्हा दुचाकीवरून जात असतात तेव्हा सर्वांचे लक्ष वेधले जाते. शेख हारून यांचे वय सध्या चाळीस वर्ष असून शहरातील मोमीनपूरा येथे पत्नी, एक मुलगा एक विवाहीत मुलगी यांच्यासोबत राहतात. हमाली करूनच ते आपल्या कुटुंबीयांचा उदरर्निवाह करतात.
या गाडीला दिवसाला फक्त शंभर रुपयाचे पेट्रोल लागते. यामुळे जास्त काम होते परिणामी मजुरी पण जास्त मिळते. दाभडी येथील दिंगाबर गाते व राजू गाते असे दोघे भाऊ आर्णी येथील शास्त्री नगरातील आडकोजी महाराज मंदिराजवळ सायकल दुरुस्तीचे काम करतात. त्या दोघांनी ही गाडी तयार केली आहे.