यवतमाळ - जिल्ह्यातील मनदेवच्या जंगलात स्त्री जातीचे नवजात बाळ आढळून आले आहे. लग्नापूर्वीच्या प्रमेसंबंधातून हे बाळ जन्माला आल्याने त्यांनी तिला जंगलात सोडले. याप्रकरणी तरुण आणि तरुणी दोघांनाही ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रेमसंबंधातून लग्नाच्या ४ दिवसापूर्वी जन्मले बाळ, भावी वर-वधूने 'नकोशी'ला सोडले जंगलात - yavatmal
लग्न ३-४ दिवसावर येऊन ठेपले होते. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात तिची प्रसुती करण्यात आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, लग्नाला ४ दिवस बाकी असताना मुलीला कस ठेवायचे? नातेवाईक काय म्हणतील? या भीतीने त्यांनी तिला मनदेवच्या जंगलात सोडले.
दिग्रस तालुक्यातील तरुणाचे मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही नात्यातीलच असल्याने घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न जुळले. येत्या २६ एप्रिलला दोघांचाही विवाह नियोजित होता. मात्र, मुलीला लग्नापूर्वीच गर्भधारणा झाली. त्यातच लग्नही ३-४ दिवसावर येऊन ठेपले होते. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात तिची प्रसुती करण्यात आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, लग्नाला ४ दिवस बाकी असताना मुलीला कस ठेवायचे? नातेवाईक काय म्हणतील? या भीतीने त्यांनी तिला मनदेवच्या जंगलात सोडले.
दुपारच्या तळपत्या उन्हात बाळ तिथेच पडलेले होते. त्यानंतर जंगलात चारोळ्या वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेला ते बाळ दिसले. त्यांनी गावातील पोलीस पाटलाच्या मदतीने ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता तब्बल ४ दिवसानंतर तरुण-तरुणीचा शोध लावण्यात पोलिसांनी यश मिळाले. त्यामधून तरुण दिग्रस तालुक्यातील, तर तरुणी दारव्हा तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.