यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 263 बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात नव्याने 199 पॉझिटिव्ह आले असून सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 263 जणांची कोरोनावर मात, सात जणांचा मृत्यू
पुसद शहरातील 62 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 व 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 25 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तसेच नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 199 जणांमध्ये 114 पुरुष व 85 महिला आहेत.
मृत झालेल्यांमध्ये सहा पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यात पुसद शहरातील 62 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 व 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 25 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तसेच नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 199 जणांमध्ये 114 पुरुष व 85 महिला आहेत. यात महागाव शहरातील आठ पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील सात पुरुष व पाच महिला, यवतमाळ शहरातील 25 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील 14 पुरुष 18 महिला, पांढरकवडा शहरातील 17 पुरुष व 10 महिला, पांढरकवडा तालुक्यातील आठ पुरुष व पाच महिला, नेर शहरातील चार पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील तीन पुरुष, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष एक महिला, पुसद शहरातील 10 पुरुष व आठ महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष, झरी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, कळंब तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व दोन महिला व जिल्ह्यातील इतर ठिकाणचा एक पुरुषाचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1194 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 274 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5449 झाली आहे. यापैकी 3835 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 145 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 287 जण भरती आहे.