महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये 54 नव्या रुग्णांची नोंद; एकाचा मृत्यू, तर 17 जणांची कोरोनावर मात - yavatmal coronavirus update

जिल्ह्यात नव्याने तब्बल 54 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष व 23 महिला आहे, तर यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागातील 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधिताचा आकडा 648 झाला आहे. त्यात 440 जण बरे झाले आहेत, तर एकूण 21 मृत्यूची नोंद आहे.

यवतमाळ कोरोना अपडेट
यवतमाळ कोरोना अपडेट

By

Published : Jul 23, 2020, 2:46 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात नव्याने तब्बल 54 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे, तर यवतमाळ शहरातील इस्लामपुरा भागातील 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असणाऱ्या 17 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष व 23 महिला आहे. यात नेर शहरातील एक पुरुष, दिग्रस येथील तीन पुरूष व तीन महिला, पुसद येथील १३ पुरुष व नऊ महिला, कळंब येथील दोन पुरूष व दोन महिला, पांढरवकडा येथील ११ पुरूष व सहा महिला, यवतमाळ येथील एक महिला, तर दारव्हा येथील एक पुरूष व दोन महिलांचा महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 151 सक्रिय रुग्ण होते. त्यात आणखी 54 रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 205वर पोहोचली होती. मात्र, 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने आणि एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 187 झाली आहे.

यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 117, तर रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे बाधित आढळलले 70 जण आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधिताचा आकडा 648 झाला आहे. त्यात 440 जण बरे झाले आहेत, तर एकूण 21 मृत्यूची नोंद आहे.

यवतमाळ शहर व पांढरवकडा शहरात विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 जुलैपासून समोरचे सात दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यात रुग्णालये व मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील. 25 तारखेपासून सुरू होणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details