यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1161 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून 1057 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 34 मृत्यू झाले. यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 7 मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर 9 मृत्यू खासगी रुग्णालयात झाले.
आतापर्यंत 1277 मृत्यूंची नोंद
शुक्रवारी (30 एप्रिल) एकूण 6545 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1161 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. 5384 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6901 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी रुग्णालयात 2539 तर गृह विलगीकरणात 4362 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 53011 झाली आहे. 24 तासात 1057 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 44833 झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1277 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 12.67 टक्के असून मृत्यूदर 2.41 टक्के आहे.
यवतमाळमध्ये सर्वाधिक 330 पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या 1161 जणांमध्ये 703 पुरुष आणि 458 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 330 रुग्ण, वणी 112, पांढरकवडा 97, घाटंजी 190, दारव्हा 41, उमरखेड 77, आर्णि 27, दिग्रस 63, पुसद 83, नेर 26, महागाव 19, मारेगाव 33, झरीजामणी 5, बाभुळगाव 3, राळेगाव 3, कळंब 45 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहेत.