यवतमाळ -माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहे. केवळ महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे आरोप होत आहे. परमबीर सिंह हे भाजपासाठी काम करीत असल्यानेच असे आरोप करीत आहे. त्यामुळे त्यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बसस्थानक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवाय भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आले.
भाजपाविरोधात राष्ट्रवादीचे यवतमाळमध्ये आंदोलन
गृहमंत्री देशमुख यांच्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी ते कोरोनाग्रस्त होते. कोणत्याही पद्धतीचा पुरावा नाही. त्यामुळे असा खोटा आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांचीच चौकशी केली पाहिजे. राज्यातील भाजपा आणि केंद्र सरकार त्यांना मदत करत आहे, असा आरोपही या आंदोलनात करण्यात आला.
राष्ट्रवादी आंदोलन