महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Naxal Extortion Letter: 50 लाख आणून दे, अन्यथा जीवे मारू; नक्षल कमांडरच्या नावाने खंडणीचे पत्र - Naxal Extortion demand of Rs 50 lakh

पोस्टद्वारे गडचिरोली नक्षल कमांडरच्या नावाने आलेल्या एका बेनामी चिट्ठीद्वारे ( Naxal Extortion Letter ) थेट घाटंजी येथील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी ( Naxalites threaten to kill family in Ghatanji ) देण्यात आली. यासह पत्राद्वारे पन्नास लाखाची खंडणी मागण्यात आली.

Ghatangi Police Station
घाटंजी पोलीस ठाणे

By

Published : Aug 6, 2022, 10:48 PM IST

यवतमाळ : पोस्टद्वारे गडचिरोली नक्षल कमांडरच्या नावाने आलेल्या एका बेनामी चिट्ठीद्वारे ( Naxal Extortion Letter ) थेट घाटंजी येथील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी ( Naxalites threaten to kill family in Ghatanji ) देण्यात आली. यासह पत्राद्वारे पन्नास लाखाची खंडणी मागण्यात आली. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 4 ऑगस्ट रोजी स्टेट बँक घाटंजी येथे उघडकीस आली.

ते पत्र खरचं नक्षलवाद्यांचे की.. ?-गजानन लवक्षमन ढवळे ( 38, रा. जगदंबा नगरी घाटंजी ) असे फिर्यादीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हे स्टेट बँकेत असताना 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास गजानन ढवळे यांना पोस्टमनने लाल रंगाचे बंद पाकीट दिले. त्यावर ढवळे यांचे संपूर्ण नाव व पत्ता लिहिला होता. दरम्यान पाकीट उघडून बघितले असता त्यामध्ये गडचिरोली नक्षल दलंग कमांडर क्र. 38 असे लिहिले होते. त्यामध्ये हिंदीत गजु ढवळे आपको लाल सलाम. तुम्हाला सुचित करण्यात येते की, तुम्ही मला 50,00,000 रु. द्या. नजर अंदाज केल्यास आपल्या परिवारातील सदस्याला जिवाने मारण्यात येईल असे लिहून होते. एवढेच नव्हे तर त्याखाली दि. 12/08/2022 चे संध्याकाळी 08/30 वा उमरी ते करंजी रोड पासून 3 किलो मीटर अंतरावर हनुमान मंदिराजवळ दर्गाच्या मागे 50 लाख रुपये ठेवा अशी धमकी दिली.

अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल- ही चिठ्ठी वाचून फिर्यादीने घाबरुन भितीपोटी कोणालाही सांगितले नाही. मात्र गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी त्यांनी घाटजी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावरून घाटंजी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे पत्र कोठून आले हे सांगता येत नाही. त्यानुसार पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहे.

हेही वाचा-Jagdeep Dhankhar : कोण आहेत जगदीप धनखड.. जाणून घ्या शिक्षण, व्यवसाय आणि राजकीय कारकीर्द..

ABOUT THE AUTHOR

...view details