महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे यवतमाळमध्ये आंदोलन - yavatmal latest news

दर महिन्याला सरकार दरवाढ करत आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे यवतमाळमध्ये आंदोलन
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे यवतमाळमध्ये आंदोलन

By

Published : Dec 27, 2020, 7:22 PM IST

यवतमाळ - गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. या दरवाढीमुळे महिला त्रस्त झाल्या असून आज यवतमाळ मध्ये बसस्थानक चौकात चूल पेटवून आंदोलन करण्यात आले.

गृहिणींनाच जास्त त्रास-

गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ ही गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक असून त्याच्याबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. दरवाढीचा हा त्रास गृहिणींनाच जास्त होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली आहे. केंद्र सरकार मात्र दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे. त्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम सरकार जाणीवपूर्वक करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने बसस्थानक चौकात चूल पेटवून आंदोलन करण्यात आले.

क्रांती राऊत, जिल्हाध्यक्ष
रॉकेल सुरू करण्याची मागणी-सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. खुल्या बाजारातील रॉकेल 70 रुपये प्रतिलिटरने खरेदी करावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्यादेखील कमी आहे. दर महिन्याला सरकार दरवाढ करत आहे. त्यामुळे दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करावी, अशी मागणीही करण्यात आली.

हेही वाचा-BREAKING : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स..

ABOUT THE AUTHOR

...view details