महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या सभेसाठी पांढरकवड्यात महिलांची मोठी गर्दी - WOMEN

जाहीर सभेच्या माध्यमातून मोदी यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची अपेक्षा.

narendra modi

By

Published : Feb 16, 2019, 10:07 AM IST

यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हातील पांढरकवडा दौऱ्यावर येत असून येथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे. वरवर पाहता हा संपूर्ण शासकीय कार्यक्रम असला, तरीपण या जाहीर सभेच्या माध्यमातून मोदी यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सभेसाठी जिल्ह्यातल्या महिलांनी मोठी गर्दी केली असून मोदी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार १८ महिला बचत गट आहेत. रोजगार निर्मिती व महिलांना सक्षम करण्यासाठी हे बचतगट कार्य करत आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये घाटंजीतील एका बचत गटाचा उल्लेख करीत बकरीच्या दुधापासून साबण बनत असल्याचे मन की बातमध्ये सांगितले होते. याच प्रकारे मार्गदर्शन करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या सभेसाठी महिलांनी गर्दी केली आहे. सभा शहरातल्या रामदेव बाबा मैदानावर होणार आहे.

याशिवाय त्यांच्या हस्ते रस्त्यांची कामे, घरकूल वितरण यांसारख्या विविध विकासकामांची पायाभरणी केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते निधींतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांची पायाभरणी, यासोबतच नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आणि लाभार्थ्यांना घरकूल वितरण, अजनी (नागपूर)-पुणे रेल्वेला व्हिडिओच्या माध्यमातून हिरवा झेंडा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच धनादेशाचे वितरण यावेळी होणार आहे. यानंतर पंतप्रधानांचे भाषण होणार असून कार्यक्रमानंतर ते सकाळी ११.३० वाजता धुळ्याला जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details