यवतमाळ -येथील ज्येष्ठ नागरिक, निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी नारायण वेखंडे यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. शिवाजीनगरात राहणारे वेखंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. विवेकानंद विद्यालय केंद्रात व्हीलचेअरवर जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
'या' मतदाराने बजावला आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क.. - MaharashtraAssemblyPolls
यवतमाळमध्ये निवृत्त मुख्याध्यापक नारायन वेखंडे यांनी आत्ता पर्यंत सर्व मतदार संघात मतदान केले. नारायण वेखंडे यांनी स्वतंत्र भारतात १९५२ पासून झालेल्या ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये मतदान केले आहे.
नारायण वेखंडे
नारायण वेखंडे यांनी स्वतंत्र भारतात १९५२ पासून झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये मतदान केले आहे. कोणत्याही कारणामुळे त्यांचे एकही मतदान हुकलेले नाही, हे विशेष.