यवतमाळ -सततच्या पावसामुळे इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे गेल्या 36 तासांपासून नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदी चांगलीच उफाळली आहे. बुधवारी (काल) सकाळी चार वाजतापासून नागपूर बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प आहेत. पुलावरून तब्बल तीन फुट पाणी वाहत असल्याने सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
इसापूर धरणाचे सर्व दरवाजे खुले
पैनगंगा नदीवरील जयपूर बॅरेज (जिल्हा वाशिम) येथिल 10 दरवाजे 2.40 मीटरने पूर्णपणे उघडले असून 667.70 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर इसापूर धरण सांडव्याचे तीन दरवाजे 1 मीटरने व दहा दरवाजे 0.50 मीटरने उघडली असून त्यामधून 768.021 क्यूमेक्स इतक्या विसर्गाने पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी