महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या - etv bharat marathi

यवतमाळ शहरातील आर्णी रोड मार्गावर पूर्ववैमनस्यातून दोघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वसीम पठाण व उमेश येरमे, असी मृतांची नावे आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 13, 2021, 1:13 PM IST

यवतमाळ - शहरातील आर्णी रोड मार्गावर जुन्या वादातून दोघांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वसीम पठाण व त्याचा सहकारी उमेश येरमे (दोघेही रा. नेताजी नगर) यांच्यावर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. दोघांनाही जागेवरच गतप्राण होईपर्यंत मारहाण करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात भाविकांची गजबज असताना हे हत्याकांड घडले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. अवधूत वाडीचे ठाणेदार मनोज केदारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. खून पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -शरीर सुखाची मागणी करत पतीने केली पत्नीचा हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details