महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळात जिल्हा रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्यांची हत्या; विद्यार्थी आक्रमक - यवतमाळात डॉक्टरची हत्या

मृत डॉ. अशोक पाल मूळचा ठाणे जिल्ह्यातील असून तो एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला होता. काल सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास तो लायब्ररी मधून आपल्या रूमकडे जात असताना त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आला.

मृत डॉ. अशोक पाल
मृत डॉ. अशोक पाल

By

Published : Nov 11, 2021, 9:50 AM IST

Updated : Nov 11, 2021, 10:08 AM IST

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Vasantrao Naik Government Medical College) शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची महाविद्यालय परिसरात हत्या (Murder of trainee doctor students) करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. डॉ. अशोक पाल असे शिकाऊ विद्यार्थ्यांचे नाव आहे. हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक झाले असून रुग्णालय परिसरात संतप्त विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा ठप्प आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची महिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जमावाला शांत केले.

जिल्हा रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्यांची हत्या

मृत डॉ. अशोक पाल मूळचा ठाणे जिल्ह्यातील असून तो एमबीबीएसच्या (MBBS) अंतिम वर्षाला होता. काल सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास तो लायब्ररी मधून आपल्या रूमकडे जात असताना त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्या छातीवर दोनदा वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच इतर शिकाऊ डॉक्टर विद्यार्थ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र साडे अकरा वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. चार महिन्यापूर्वी शहरातील काही तरुणांसोबत त्याचा वाद झाला होता. त्यावेळीही शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. अशी चर्चा परिसरात होती. त्यामुळेच त्याच्यावरती चाकू हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Nov 11, 2021, 10:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details