महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून पुसद तालुक्यातील युवतीचा धारधार शस्त्राने खून, आरोपीचा शोध सुरू - एकतर्फी प्रेमातून खून

एकतर्फी प्रेमातून पुसद तालुक्यातील युवतीचा धारधार शस्त्राने खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Murder of a young woman from Pusad taluka with a sharp weapon due to one sided love
एकतर्फी प्रेमातून पुसद तालुक्यातील युवतीचा धारधार शस्त्राने खून

By

Published : May 15, 2021, 7:57 PM IST

यवतमाळ - पुसद तालुक्यातील रामपूरनगर येथे राहणाऱ्या युवतीचा एकतर्फी प्रेमातून चाकू व गुप्तीने खून केल्याची खळबळ जनक घटना घडली. खंडाळा पोलीसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले असून मुलीचा मृत देह पुसद उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

चाकू व गुप्तीने केले वार -

खंडाळा पोलीस स्टेशनच्या हददीत येत असलेल्या रामपूर नगर येथे राहणारी सुवर्णा अर्जुन चव्हाण (वय.२१) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. रामपूर येथे राहणारी सुवर्णा चव्हाणचे वडील, आई, भाऊ बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून गावात राहणारा आरोपी युवक आकाश श्रीराम आडे (वय २५) याने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या घरात घुसून युवतीच्या पोटात चाकू व गुप्तीने वार करून जखमी केले. जखमी झालेल्या युवती गंभीर झाल्याने घरात रक्ताचा सडा पडला होता. यातच युवतीचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीचा शोध घेणे सुरु -

युवतीला जीवे मारल्याची माहिती वाऱ्या सारखी गावात पसरली आणि गावात राहणाऱ्यांनी खंडाळा पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून खून पंचनामा केला. युवतीचा मृतदेह पुसदच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. युवतीला मारणारा आरोपी आकाश आडे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. युवतीच्या वडील, आई व भावाला याबाबत माहिती देण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपी विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details