यवतमाळ- कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरीच आहेत. त्यात सद्या उन्हाळा सुरू आहे. या काळात वीज पुरवठा खंडित झाला तर लाईनमन अवघ्या काही वेळात वीज पुरवठा पुर्ववत करत आहेत. नागरिकांना यामुळे दिलासा मिळत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग यवतमाळ शहरात वाढत चालला आहे. शहरी भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तरी देखील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. यामुळे नागरिक आपापल्या घरी राहणे पसंत करत आहे. या लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.