ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीकविमा कंपनीच्या विरोधात खासदार गवळींच्या नेतृत्वात सोमवारी आंदोलन - पीकविमा कंपनीच्या विरोधात खासदार भावना गवळी

पीक विमा कंपनी आपल्या जाचक अटी समोर ठेवून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकांच्या विम्याची मदत तातडीने मिळावी यासाठी सोमवारी (ता.28 डिसेंबर) खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीला घेराव घालो आंदोलन करण्यात येणार आहे.

यवतमाळ
यवतमाळ
author img

By

Published : Dec 25, 2020, 4:39 PM IST

यवतमाळ- यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूरीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, पीक विमा कंपनी आपल्या जाचक अटी समोर ठेवून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकांच्या विम्याची मदत तातडीने मिळावी यासाठी सोमवारी (ता.28 डिसेंबर) खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीला घेराव घालो आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार. शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेतही मांडू आणि वेळ पडल्यास न्यायालयाचीही दरवाजे ठोठाऊ, अशी भूमिका खासदार भावना गवळी यांनी घेतली आहे.

यवतमाळ

चार साडेचार लाख शेतकर्‍यांनी काढला विमा
जिल्ह्यातील चार लाख 67 हजार 21 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला आहे. याकरिता केंद्र शासन राज्य शासन तसेच शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे 35 कोटी 75 लाख एक हजार 251 रुपयांचा विमा हप्ताही भरला. संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करणाऱ्या फक्त 9 हजार 547 शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला. उर्वरित शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे लाभ मिळू शकला नाही. पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासात विमा कंपनीकडे माहिती द्यावी अशीही अट यात आहे. अनेक शेतकऱ्यांना याची माहिती सुद्धा नाही. त्यामुळे कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
विमा कंपनीचे केवळ शंभर प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके असून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी पिक विमा कंपनीने फक्त शंभर प्रतिनिधी ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकरी नुकसानीचा दावा करू शकले नाही. विशेष म्हणजे कृषी विभाग व महसूल विभागने सुद्धा जिल्ह्यात साडेचार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधितती झाल्याचा सर्वे केलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details