यवतमाळ: बर्डफ्लूची दहशत संपत नाही तोच अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्युमूखी पडल्याचा प्रकार जिल्ह्यातील नेर येथे घडला आहे. यामुळे कुक्कुटपालक चिंतेत आहेत. मृत कोंबड्या यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.
यवतमाळमध्ये अज्ञात आजाराने शंभर पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू; कुक्कुटपालक चिंतेत - yavatmal bird flu news
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे आधीच लोक धास्तावले आहेत. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. यातच कोंबड्यांना नवीन रोगाची लागण झाली आहे. अशातच अज्ञात आजाराने शेख नदीम यांच्या जवळपास शंभराहून कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.
कोंबड्यांचा मृत्यू
Last Updated : Mar 15, 2021, 7:20 PM IST