यवतमाळ - जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून दररोज शंभराहून अधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी(१८) तब्बल 237 रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. मागील तीन महिन्यानंतर एकाच दिवशी दोनशेच्यावर रुग्ण बाधिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दर दिवशी एक ते दोन बाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याने प्रशासनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामाला लागले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
यवतमाळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; एका दिवशी 237 पॉझिटिव्ह रुग्ण - कोरोना रुग्णांची संख्या वाढली
मागील तीन महिन्यानंतर एकाच दिवशी दोनशेच्यावर रुग्ण बाधिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दर दिवशी एक ते दोन बाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याने प्रशासनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामाला लागले आहे.
ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. अशातच डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात रुग्ण संकेत घट झाली असली तरी डिसेंबर महिन्यात 29 तर जानेवारी महिन्यात 25 आणि फेब्रुवारी महिन्यात 12 वर मृत्यूची नोंद झालेली आहे.
तीन तालुक्यात रुग्ण संख्या वाढली-
जिल्ह्यातील पुसद पांढरकवडा आणि यवतमाळ या तीन तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या आढळून येत आहे. या तीनही तालुक्यातून प्रतिदिन पाचशे याप्रमाणे दिवसाला पंधराशे नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोणा बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने त्यामागील कारणांचे विश्लेषण करून ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे आणि जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिले आहेत.