..तर मनसे स्टाईलने धडा शिकवू, स्थानिक बेरोजगारांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक
वणी विभागात मात्र, सामान्य माणसाच्या रोजगारावर मुजोर कंपनी धारकांकडून कुऱ्हाड चालवली जात आहे. स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीकडून डावलले जात आहे. त्यामुळे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे स्थानिक बेरोजगार युवकांनी आपली व्यथा मांडून रोजगार मिळवून देण्याची मागणी केली.
यवतमाळ - बघावं तिकडे बेरोजगारीचा भस्मासूर वाढत चालला आहे. त्यातही कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा सामान्य माणूस अत्यंत समर्थपणे मुकाबला करत आहे. असे असताना वणी विभागात मात्र, सामान्य माणसाच्या रोजगारावर मुजोर कंपनी धारकांकडून कुऱ्हाड चालवली जात आहे. स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीकडून डावलले जात आहे. त्यामुळे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे स्थानिक बेरोजगार युवकांनी आपली व्यथा मांडून रोजगार मिळवून देण्याची मागणी केली. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी थेट कंपनीमध्ये जाऊन गौरव कन्सट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसात स्थानिकांना न घेतल्यास मनसे स्टाईल न्याय मिळवून देण्याचा इशारा राजू उंबरकर यांनी दिला.